परंडा(प्रतिनिधी) परंडा शहरात अनेक महिन्यापासून दळणवळणाचे रस्ते खोदून ठेवले आहेत त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली आहे. खडी टाकून अनेक दिवस झाले ना सिमेंट ना पाणी यामुळे खूप मोठ्या प्रमाणात धूळ उडून दुकानदार व्यवसायिक नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या थंडीचे दिवस, कारखाने चालू असल्यामुळे शाळा महाविद्यालय चालू असल्याने मोठ्या प्रमाणात बावची चौक या रस्त्याने वाहतूक होते या रस्त्याने चालत जाणारे नागरिक सायकलवरील लहान विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या नाका तोंडात धूळ जाऊन लहान मुले,मुली वयोवृद्ध माणसे आजारी पडायला सुरुवात झाली आहे.
या कामाकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष आहे हे टेंडर निघून अनेक महिने उलटून गेले परंतु अद्यापही ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही या बाबीकडे त्वरित वरिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी लक्ष घालून नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा त्रास कमी करावा, त्वरित रस्त्याचे काम चालू करून नागरिकांच्या श्वास मोकळा करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.