संघर्ष बाळासाहेब गांगर्डे जुदो कुस्ती स्पर्धेत ; ५० किलो खालील वजन गटात लातूर विभागात दुसरा.

परंडा(प्रतिनिधी)तालुक्यातील शेळगांव येथील माणिकबाबा मा.व उच्च मा. विद्यालयाचा विध्यार्थी संघर्ष बाळासाहेब गांगर्डे जुदो कुस्ती स्पर्धेत ५० किलो खालील वजन गटात लातूर विभागात दुसरा आला आहे
दि.०५-११-२०२५ रोजी औसा जि. लातूर या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत माणिकबाबा विद्यालयाचा संघर्ष बाळासाहेब गांगर्डे या खेळाडूने लातूर विभागातून द्वितीय क्रमांक मिळवला या मुळे संस्था अध्यक्ष मा. ॲड.सुभाषराव मोरे ,संस्था सचिव मा.श्री.अमर मोरे,मा.प्राचार्य मा.श्री. संभाजीराव मोरे,श्री.सुधाकर खरसडे, श्री. गुरुदास काळे, ह.भ.प.श्री.विजय परदेशी सर,आणि शेळगाव पंचक्रोशितील सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने संघर्ष बाळासाहेब गांगर्डे खेळाडू तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पांडुरंग कुमटकर सर, क्रीडाशिक्षक श्री. सतीश शिंगाडे सर, क्रीडा मार्गदर्शक श्री. गणेश शेंडकर सर, आणि माणिकबाबा विद्यालयातील सर्व शिक्षक, मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे अभिनंदन केले

error: Content is protected !!