डोंजा (प्रतिनिधी) परंडा तालुक्या सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले होते.त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था शेतकरी, विद्यार्थी,शाळा व पुरग्रस्ताच्या मदतीला धावून आल्या त्यातीलच एक संस्था म्हणजे जे. एम चॅरिटेबल ट्रस्ट. या ट्रस्टच्या वतीने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसावीवाडी (डोंजा )येथील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या ,पेन, पेन्सिल ,खोड रबर इत्यादी शालेय साहित्याचे वाटप गटशिक्षणाधिकारी श्री.सुर्यभान हाके, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.दादासाहेब घोगरे, केंद्रप्रमुख श्री.धनाजी खरात, केंद्रीय मुख्याध्यापक श्री.राजगुरू गिरी.यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनाप्रमाणे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉक्टर मल्हारी, पप्पू जाधव, लक्ष्मण जाधव, सुरेखा कौले मुख्याध्यापक अनिल गिरी शिक्षिका श्रीमती सविता गिरी व विद्यार्थी उपस्थित होते. शालेय साहित्य वाटल्याबद्दल संस्थेचे आभार मुख्याध्यापक अनिल गिरी सर यांनी मानले.