देवगांव (बु) येथील नळी नदीवरील पुलाची दयनीय अवस्था- प्रशासनाचे दुर्लक्ष

परंडा( प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील देवगांव (बु) येथील नळी नदीवरील पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. देवगांव ( बु ) येथील रस्ता हा वर्दळीचा आहे. अतिवृष्टीमुळे नळी नदीच्या पुलावरून पाणी चा जोराचा प्रवाहा होता त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजू वाहून गेल्या आहेत. दोन्ही बाजू खचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

    तसेच या रस्तावरून देवगांव ( बु ) व जेकटेवाडी येथील नागरिकांना आंबी ता. भूम येथे आठवडा बाजार , पोलिस ठाणे आणि सरकारी दवाखान्यात जावे लागते तसेच येथील नागरिकांना दळवणासाठी या रस्तावरून ये – जा करावी लागते परंतु या रस्तावरील पुलाच्या दोन्ही बाजू पाण्याने वाहून गेल्या आहे त्यामुळे सदरील रस्ता हा रस्ता अर्धा झाला आहे त्यामुळे एस टी महामंडळाची गाडी येत नाही त्यामुळे शाळा चालू झाल्यास विद्यार्थ्याचे हाल होणार आहे तरी प्रशासनाने तात्काळ पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी विद्यार्थी’,वाहनधारक आणि प्रवाशांमधून होत आहे.

error: Content is protected !!