परंडा (तानाजी घोडके) तालुक्यातील दळणवळणाच्या रस्ता , सडक ग्रामीण भागातील रस्ते निगराणी करणारे कार्यालय म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग या बांधकाम विभागातील कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भिंती खिडक्या ऑफिस कोपरे गोवा, मावा, पान पिचकार्याने रंगलेल्या पहावयास मिळाल्या . दर्शनी भागामध्ये खिडक्यांच्या कोपऱ्यामध्ये हे दृश्य सार्वजनिक बांधकाम विभागातील आहे.
याकडे वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले या बातमीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी धाराशिव परंडा येथील कार्यकारी अभियंता अधिकारी सौ. वडगावे काय निर्णय घेतात याकडे नागरिकांची लक्ष लागले आहे.