पत्रकार गणेश वाघमोडे यांनी केली पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी

परंडा(प्रतिनिधी) पत्रकार गणेश वाघमोडे यांनी यंदाची दिवाळी पूरग्रस्तांसोबत साजरी करण्यात निर्णय घेतला होता. वाघमोडे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना गृहपयोगी साहित्य आणि फराळ देऊन यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. वाघमोडे यांनी वैयक्तिक स्तरावर हा उपक्रम हाती घेऊन पूरग्रस्त कुटुंबांना प्रभावित केले.

धाराशिव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुरामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. महापुराचा सर्वाधिक फटका परंडा तालुक्याला बसला आहे. महापुरामुळे नदीकाठीची अनेक गावे प्रभावित झाले आहे या पोराच्या धोक्यातून अद्यापही गावे सावरले नाहीत. पुराचे पाणी शिराळ्यात देखील घुसले होते परिणामी अनेकांचे संसार उध्वस्त झाले. अनेकांना विस्थापित व्हावी लागले.अनेक शेतकऱ्यांच्या पिकासह शेत जमिनी खरडून गेल्या.

महापुरामुळे शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत गणेश वाघमोडे यांनी पुण्यात न राहता आपली दिवाळी पूरग्रस्त सोबत साजरी करण्याचा संकल्प केलेला होता. याच अनुषंगाने पुराच्या पाण्यामुळे कोलमडलेल्या शेतकरी बांधवांना गृह उपयोगी साहित्य मदत करून फराळ देऊन दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न पत्रकार गणेश यांनी केला आहे. वाघमोडे यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या उपक्रमासाठी वाघमोडे यांचे सहकारी तुकाराम ढोरे,सदानंद बोंबलट,रामदास पाटील,बाळासाहेब ढोरे,अमोल वाघमोडे या शिलेदारांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!