दिव्यांगांना संजीवनी : एक हात मदतीचा!

नागपूर(माझं गांव माझं शहर) मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली आज नागपूरमध्ये एक समाजमनाला स्पर्श करणारा उपक्रम पार पडला. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ई-रिक्षांचे वाटप करण्यात आले.

जवळपास पाचशे दिव्यांग लाभार्थ्यांना पारदर्शक लॉटरी प्रक्रियेनंतर आणि वैद्यकीय तपासणीनंतर ई-रिक्षा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे आत्मनिर्भरतेच्या प्रवासात दिव्यांग बांधवांना एक नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सातत्यपूर्ण प्रयत्न यामधून अधोरेखित झाला आहे.

याच कार्यक्रमात ‘स्ट्रीट फूड’ व्यवसायासाठी आवश्यक साहित्याने सज्ज गाड्यांचे वाटप तसेच आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांना सायकल वाटप करून त्यांच्या सेवाभावी कार्यात अधिक सुलभता आणण्यात आली. तसेच अनुसूचित जातीतील भूमिहीनांना शेतजमीन वाटपाचा निर्णय पुन्हा सुरू करून सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहिला गेला आहे.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीनुसार वंचित घटकांना सशक्त करून त्यांना स्वाभिमानाने उभे करण्याचे कार्य राज्य सरकार सातत्याने करत आहे. आजचा हा उपक्रम म्हणजे संविधानाने अपेक्षित केलेल्या शेवटच्या माणसाच्या विकासाचे जिवंत उदाहरण आहे.

ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या संवेदनशील आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे राज्यातील प्रत्येक घटकासाठी ‘विकास’ हा केवळ शब्द न राहता प्रत्यक्षात उतरलेली कृती ठरली आहे. दिव्यांग, वंचित आणि दुर्बल घटकांच्या आयुष्यात बदल घडविण्याचे हे प्रयत्न ‘संजीवनी’ ठरत आहेत.

error: Content is protected !!