परंडा (प्रतिनिधी) आधार सामाजिक संस्था व रोटरी क्लब पाषाण पुणेच्या वतीने पूरग्रस्त 600 विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.गेल्या महिन्यात आलेल्या महापुराने शेतीसह सर्वच उध्वस्त झालेल्या पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पाषाण पुणे यांच्या सहकार्याने परंडा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आधार सामाजिक संस्थेच्या वतीने परंडा तालुक्यातील 600 पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
समाजातील वंचित घटकांना नेहमीच मदत करण्यात अग्रस्थानी असलेल्या शहरातील आधार सामाजिक संस्थेच्या वतीने 22 सप्टेंबर पासून अविरत तयार जेवण, कोरडा शिदा, कपडे, औषधे, स्वच्छ पिण्याचे पाणी आत्तापर्यंत पोहोचविण्यात आले. याच पुराच्या पाण्याने तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले किंवा पाण्यात भिजून खराब झाले त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञान आत्मसात करणे कठीण जात होते आणि सर्वां बरोबर शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा निर्णय घेतला. या साहित्य वाटपासाठी रोटरी क्लब पुणे पाषाण च्या अध्यक्षा सौ.प्राजक्ता जेरे व सर्वांनी विचार करुन आधार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटपाचा निर्णय घेतला.साहित्य वाटपाची सुरुवात देवगाव येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब च्या अध्यक्षा सौ.प्राजक्ता जेरे व पुर्वाध्यक्ष प्रदीप मुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रोटरीच्या पुर्वाध्यक्ष सौ.अंजली मुळे,रोटेरियन गोविंद बहिरट पूर्वाध्यक्ष,सेवा प्रकल्पचे संचालक अभिजित वाणी, नोबल कलासेस चे संचालक प्रा. शेख सर आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जुल्फीकार काझी, कुणाल जाधव,सोहेल काझी, तौफिक मशायक,मुख्याध्यापक,शिक्षक व संस्थेचे उपस्थित होते.