मा.मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील व मा.खासदार शिवाजीराव पाटील पुरग्रस्त गावातील दिव्यांगाच्या मदतीला आले धाऊन ..

परंडा (दि१५ ऑक्टोंबर)परंडा तालुक्यातील पुरग्रस्त वागेगव्हाण,नालगाव,लोणी येशील दिव्यांगांना दिव्यांग उद्योग समुहाचे अध्यक्ष तानाजी घोडके व संस्थेच्या सचिव सोनाली घोडके यांच्या हस्ते जिवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करून
दिव्यांगाना मदतीचा हात दिला आहे.
परंडा तालुक्यातील महापूराच्या पाण्यामुळे व अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झालेल्या दिव्यांगाच्या पाठीशी दिव्यांगउद्योग समूह ही सामाजिक संघटना उभी राहिली आसून तहसीलदार निलेश काकडे यांच्या सहकार्याने व मा.मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील व मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांना जिवनावश्यक किटच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी चिंचपूर अध्यक्ष अशोक भराटे,ज्योती कुलकर्णी,अनंता सावंत,नसीर शेख,शेख रहीम,मयूर शिंदे,बापू साठे,संतोष चव्हाण,राजेंद्र चव्हाण,जीवन सावंत,मीना डोरले, टायर सय्यद,असलम सय्यद,गणेश क्षीरसागर,अजित जाधव,नालगाव येथील दिलीप ओव्हाळ,लोणी उत्तम शिंदे,चंद्रकला केमदारणे,छगन शिंदे,पवन शिंदे,देऊळगाव येथील प्रकाश बदर’,कविता शिंदे आदी दिव्यांग बांधवाना दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके,संस्थेच्या सचिव सोनाली घोडके यांच्या हस्ते जिवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला आहे.

error: Content is protected !!