परंडा( प्रतिनिधी) तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांचे शेतीचे घराचे नुकसान झाले, संसार उघड्यावर पडला घरात पाणी शिरले शेतीचे नुकसान झाले अशा दिव्यांग बांधवांना दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्यानुसार एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत दिलीपराव वळसे पाटील, शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या संकल्पनेतून परंडा तालुक्यातील पूरग्रस्त दिव्यांग बांधवांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
यावेळी आनाळा कौडगाव, खासापुरी भोत्रा, इत्यादी गावातील ५० दिव्यांगांना अन्नधान्य मदत किट वितरित करण्यात आले यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके, संस्थेच्या सचिवा सोनाली घोडके सह दिव्यांग दादा माने समाधान पन्हाळे योगेश बनसोडे क्षीरसागर तात्या सोमनाथ गडकर,कुंभार आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.