भाजपच्या वतीने देवगाव येथील पशुपालक शेतकरी बांधवांना चारा वाटप..

परंडा:- महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री श्री. संजय (बाळा) भेगडे व भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. गणेश भेगडे यांच्या संकल्पनेतून पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था व भारतीय जनता पार्टी, किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा तालुक्यातील देवगाव (खु) येथे पशुपालक शेतकरी बांधवांना चारा वाटप करण्यात आला.

धाराशिव जिल्हात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव व पशु यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले परंतु पशुपालक यांची अडचण लक्षात घेऊन पशुंना एक ट्रक चारा मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष श्री. अरविंद रगडे, जेष्ठ नेते राजाभाऊ चौधरी, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, सुखदेव टोंपे, शिवाजीराव पाटील, अमोल केमदारने, माजी सरपंच पाटील, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, बबन चौधरी, नागेश शिंदे, रामदास गुडे, योगेश डांगे, व्यंकटेश दिक्षित तसेच इतर मान्यवर व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

error: Content is protected !!