पूरग्रस्तांसाठी तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट कडून ५१ लाख रुपयांची मदत जाहीर; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

माझं गांव माझं शहर(तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीत संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट सरसवली आहे तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून ५१ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी जमा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी प्रसारमाध्यमांद्वारे दिली आहे.परंडा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून अनेक दानशूर मदतीला पुढे येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव जिल्ह्यातील अनेक नागरिकांच्या आरोग्य सेवेला तत्पर असणाऱ्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केल्यामुळे आपत्तीग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी हातभार लागला जाणार आहे.

error: Content is protected !!