परंडा दि.२७ (प्रतिनिधी) सध्या धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी महापूर आल्याने अनेक लोकांची घरे उध्वस्त झाली आहेत अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.अनेक गावामध्ये पावसाचे पाणी जाऊन घरातील खाण्याची राहण्याची अत्यावश्यक सर्व वस्तू मुसळधार पावसाने वाहून गेले आहे संपूर्ण घर पावसामध्ये असल्याने लोकांची दयनीय अवस्था झाली आहे. तेव्हा अशा लोकांना मदतीची गरज असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून परंडा शहरातील समाजसेवक अतिक उर्फ पप्पू पठाण यांनी आपली तब्येत चांगली नसताना सुद्धा आपल्या मुलांना घेऊन अनेक गावांमध्ये २५० जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले आहे.
पप्पू पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब लोकांना सहकार्य करीत आले आहेत. कोणतीही प्रसिद्धीं न करता ते समाज कार्य करत आहेत.
परंडा शहरातील एकाही पुढाऱ्यांनी या पूरग्रस्त लोकांना मदत केली नाही परंतु अतिक उर्फ पप्पू पठाण यांनी मात्र समाजसेवेचे वृत्त स्वीकारत माणुसकी जपली आहे. त्यांनी अनेक लोकांना वेगवेगळ्या कामासाठी सहकार्य करून माणुसकी जपली आहे . त्यांच्या या कार्यास सर्वत्र कौतुक होत आहे.