धाराशिव जिल्ह्यात “अजितदादा पवार” यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा.

भूम(तानाजी घोडके ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आज धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला. त्यांच्यासोबत विविध भागात जाऊन संवाद साधला.

मा. अजितदादांनी आपल्या २४३ परांडा विधानसभा मतदारसंघातील भूम तालुक्यातील चिंचोली येथे पुरात मृत्युमुखी पडलेल्या कै. देवनाबाई वारे यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली. गोरमाळा येथे पाहणी करून शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला. वालवड येथे फुटलेल्या दोन्ही पाझर तलावांची पाहणी केली. पाठसांगवी येथे तुटलेल्या पुलाची पाहणी केली. तसेच हिवर्डा येथील शेतकऱ्यांशी देखील संवाद साधत चर्चा केली.

माननीय अजितदादांनी परांडा तालुक्यातील वडणेर, देवगाव येथेही भेटी देऊन शेतकरी व गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांना दिलासा दिला. आज पुन्हा एकदा माननीय दादांच्या समृद्ध नेतृत्वाचा अनुभव घेतला. त्यांनी अगदी आपुलकीने सर्वांची विचारपूस केली. लवकरात लवकर त्यांना मदत मिळवून देण्याचा शब्द दिला.

माझ्या या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी माझाही पाठपुरावा सुरू राहणारच आहे. लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

error: Content is protected !!