परंडा -दि.२४ रोजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांना परंडा विधानसभा मतदार संघातील सर्वच तालुक्यामधे अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यासाठी धाराशिव चे लोकप्रिय खासदार ओमदादा राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना-उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे परंडा तालुकाप्रमुख मेघराज दादा पाटील यांनी माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे नद्या, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे पुर परिस्थीती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील सोयाबिन, मुग, उडीद, मका, फळबागा व ऊस इत्यादी सर्व पिके उध्वस्त झाली आहेत. परंडा विधानसभेतील सर्वमंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद देखील झाली आहे. त्यामुळे मा.उपमुख्यमंत्रीसाहेब आपण “माय बाप सरकार” चे प्रमुख म्हणुन आपल्याकडे खालील प्रमुख मागण्या करत आहोत. तरी त्या मान्य करणेबाबत आपल्या स्तरावरुन सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा ही विनंती केली…!!!