करमाळा (तानाजी घोडके ) सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे 14 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना माजी अध्यक्ष मुख्याध्यापक संघ महामंडळ सुभाषराव माने मा.आ. जयंत आसगावकर आमदार पुणे शिक्षक मतदार संघ, आमदार दत्तात्रय सावंत , शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे , अध्यक्ष सोलापूर मुख्याध्यापक संघ तानाजी माने, सचिव बापू नीळ यांच्या उपस्थितीमध्ये मोहोळ येथील सभागृहामध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये करमाळा तालुक्यातील धर्मवीर संभाजी विद्यालयातील सहशिक्षक यशवंत वामन कोळेकर यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विद्यालयातील सहशिक्षक उत्तम हनपुडे, सुखदेव गिलबिले, इंग्रजीत मुळीक, संतोष पुराणे,अशोक जावळे शिक्षकेतर कर्मचारी बापू तांबोळी व कोळेकर कुटुंबातील मुलगा मुलगी पत्नी नातेवाईक उपस्थित होते. या पुरस्कारामुळे सर्व विद्यार्थ्याकडून पालक,ग्रामस्त याकडून कौतुक होत आहे.