मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेशाचा निर्णय तात्काळ मागे घ्या – ओबीसी कृती समिती परंडा

परंडा(माझं गांव माझं शहर ) १ सप्टेंबर २०२५ रोजी शासनाने मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने व्यापक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती परंडा तालुक्याच्या वतीने परंडा तहसीलदार यांना निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
ओबीसी आरक्षणास बाधा निर्माण करणाऱ्या निर्णयाबाबत ओबीसी समाज तीव्र विरोध करत आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद 15 (4 )व 16 (4) प्रमाणे आरक्षण हे फक्त सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांना देता येते. मराठा समाजाचा समावेश हा या तत्त्वांचा भंग करत आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे आधीच मर्यादित रुंदी असलेल्या ओबीसी समाजातील घटकांना आणखीन मागे ढकलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालय व विविध आयोगांनी स्पष्ट केले आहे की केवळ राजकीय दबावाखाली जातीचा समावेश आरक्षणात करता येत नाही . त्यामुळे सकल ओबीसी समाज या शासन निर्णयाचा तीव्र निषेध करतो. हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने व्यापक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे..
या निवेदनावर अखिल भारतीय समता परिषदचे जिल्हाध्यक्ष बिभीषण खुणे, सावता परिषद मुख्य संघटक शिवाजी येवारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड.सुजित देवकते ॲड.भालचंद्र अवसरे ॲड .तानाजी वाघमारे , राष्ट्रवादी ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. नवनाथ वाघमोडे , जीं . प.माजी सदस्य मारूती मासाळ,,राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष नंदू शिंदे, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष अप्पा तरटे, माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक सतिश मेहेर, दयानंद बनसोडे , पै.संतोष मेहेर, राजू अलबत्ते, बालाजी गायकवाड, पै.राहुल वाघमारे दिव्यांग संघटनेचे शहर अध्यक्ष गोरख देशमाने , भाजप युवक शहर अध्यक्ष अविनाश विधाते, दादासाहेब विधाते , अरुण अलबत्ते, रफिक मुजावर, संतोष जमदाडे,तानाजी मेहेर, गणेश कोळी, बापु मुळे, उमेश बागल, धनंजय आदलिंगे, अजीम मुजावर, विकास वेळेकर, दत्ता मेहेर,गणेश जमदाडे, सुरेश वाघमारे, शांतीलाल वाघे, हरी डिकुळे, सुभाष मेहेर, इंजिनियर अनिल नाळे, मास्टर भीमराज शिंदे, नारायण मेहेर, बाळासाहेब शिरसकर, भालचन्द्र शीरसकर , राजू बागल, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!