परंडा(माझं गांव माझं शहर) साकत मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन वेस्टेज पाणी जात असल्याने ते कुंभेफळ पाझर तलावात सोडावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 15 दिवसांपूर्वी शाखा अधिकारी जलसिंचन शाखा क्र.15 जलसिंचन विभाग परांडा यांच्याकडे करण्यात आली होती.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत जलसिंचन विभागाचे कर्तव्यनिष्ठ कर्मचारी बिट प्रमुख बाबुराव तनपुरे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नातून साकत प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून वेस्टेज जाणारे पाणी कुंभेफळ पाझर तलावात सोडण्यात आले.
याचा परिणाम असा झाला की सध्या कुंभेफळ पाझर तलाव शंभर टक्के क्षमतेने भरला असून उन्हाळ्यात गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही.या निर्णयामुळे कुंभेफळ गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून मनसे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी जलसिंचन विभागाचे बिट प्रमुख बाबुराव तनपुरे यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, “वेळीच पाऊल उचलल्यामुळे गावाला आयुष्यदायी पाण्याचा स्रोत मिळाला असून उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. यासाठी आम्ही जलसिंचन विभागाचे मनःपूर्वक आभार मानतो.” या वेळी मनसे जिल्हा उप -अध्यक्ष शाबीर भाई शेख जिल्हा सचिव रोहिदास मारकड, सोशल मीडिया अध्यक्ष किशोर गायकवाड, कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अजय भैय्यातांबिले, शाखा अध्यक्ष योगेश आवाळे, व कुंभेफळ ग्रामस्थ उपस्थित होते