परंडा:- बैलपोळा सणानिमित्त ढोल ताशाच्या गजरात सजावट केलेल्या बैलांची मिरवणुक..!

परंडा (तानाजी घोडके ) लाडक्या सर्जा-राजासाठी महत्वाचा असणारा बैलपोळा सण पारंपारिक प्रथेनुसार,शुक्रवार दि..२२ रोजी ऊत्साहात साजरा करण्यात आला.बैलांची आकर्षक सजावट करुन वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली होती.घरलक्ष्मी महिलांनी विधिवत पुजा करुन पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दिला.
आपल्या लाडक्या बैलांना सोबती घेऊन शेतकरी शेतीतुन चांगले उत्पन्न घेण्यासाठी काबाडकष्ट करतो.माञ,निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे अर्थकारण बिगडुन शेती व्यवसाय अडचणीचा होऊ लागला आहे.शेतकऱ्यांचा लाडका सर्जा राजाची बैलजोडीकडे दुर्लक्षित होतानाचे चिञ दिसुन येत आहे. बैलपोळ्याला महत्व असुन, शेतकरी या दिवशी लोणी, हाळद लावुन खांदामळणीची बैलांची माॕलीश करतात.या बैलपोळा सणाच्या माध्यमातुन शेतकरी पशुधनाप्रती जिव्हाळा व्यक्त करतात.बच्चेकंपनी,शेतकरी , कुटुंबातील महिलावर्ग बैलांसह इतर पशुधनांच्या सजावटीसाठी रमुन गेले होते.बैलांच्या शिंगाना हिंगुळ लावणे,रंगबेगीड,गोंडे सर,झुली,चंगाळे,नवीन कासरे,रंगरंगोटी करुन मोठी सजावट करण्यात आली होती.

त्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासुन शहरात बैलांच्या ढोल ताशांच्या गजरात शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन वाजत गाजत मिरवणुकीला ठिकठिकाणी सुरुवात झाली.शहरातील,जय भवानी चौकातील काळा मारुती मंदिरात बैलांना दर्शनाला आणुन मंदीराच्या दर्शनीभागावर फेकुन नारळ फोडण्याची मोठी प्रथा आहे.फोडलेले नारळ तुकडे घेण्यासाठी लहान मुलांची झुंबड उडाली होती.मिरवणुकीने बैलजोडी घरी आल्यानंतर विधीवत पुजा करुन पुरणपोळी नैवेद्य दाखवण्यात आला.आपल्या लाडक्या बैलांचा बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

error: Content is protected !!