परंडा(माझं गांव माझं शहर) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. डॉ. रामदास आठवले हे उद्या दि.२२ रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्या- तील पदाधिकारी यांच्या कुटूंबातील दु :खद घटना झालेने, भूम येथे भागवत शिंदे, सारोळा येथे भालचंद्र कठारे, यांचे कुटुंबाला सांत्वनपर भेट देऊन, जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्याशी येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात विचारविनिमय करून मार्गदर्शन करणार आहेत. दिवसभरांचे सर्व कार्यक्रम आटोपून रात्री नऊ वाजता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राज्य सचिव संजय कुमार बनसोडे यांचे परंडा येथील निवासस्थानी पदाधिकारी यांची परीवारीक मेळावा तथा बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. या दौरा कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहणेचे आवाहन परंडा तालुका अध्यक्ष दादा सरवदे व जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष आकाश बनसोडे यांनी केले आहे.
.