भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या वार्षिक निकालात प्रिती महाद्वार व स्वप्नाली हुके प्रथम

कळंब (प्रतिनिधी): धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत कार्यरत असलेल्या भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

प्रथम वर्षामध्ये प्रिती रमेश महाद्वार हिने ८४.००% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.तर ज्योती ज्ञानेश्वर मोरे-८१.७०% द्वितीय क्रमांक,साक्षी संतोषराव कवडे – ८०.६०%, तृतीय क्रमांक आकांक्षा अशोक पसारे व सपना सर्जेराव टळे – ८०.२०%, संयुक्त चतुर्थ क्रमांक मिळविला.
द्वितीय वर्षात स्वप्नाली हुके हिने ८३.००% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला.तर नेहा हरिश्चंद्र शिरसट – ८२.७५%, द्वितीय संयुक्ता प्रदीप सुके – ८१.१०%, तृतीय तेजस्विनी बाळासाहेब जगताप – ८०.९५%, चतुर्थ साक्षी काकासाहेब वाघमारे – ८०.२५%, पाचवा क्रमांक मिळवला आहे.

प्रथम वर्षातील एकूण ४७ विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर २८ विद्यार्थी एटीकेटीसह उत्तीर्ण झाले.द्वितीय वर्षातील एकूण ४४ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या गुणवंत छात्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.वेदप्रकाश पाटील डॉ.प्रतापसिंह पाटील व आमदार राहुल पाटील यांच्यासह प्राचार्य सतिश मातने व शिक्षक वर्गाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!