उमरगा(प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटन आढावा बैठक उमरगा येथे संपन्न झाली संभाव्य जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने हि बैठक घेण्यात आली याप्रसंगी अँड.प्रणित डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.राम गायकवाड यांच्या पुढाकाराने उमरग्याच्या शासकीय विश्राम गृह येथे अनेकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यामध्ये पक्षात प्रवेश करणारे माजी नगराध्यक्ष भीम सरपे यांचे सुपुत्र अमोल भीम सरपे,मराठा समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या मयुरी पैलवान,बंजारा समाजाचे संतोष राठोड,चर्मकार समाजाचे रोहिदास उद्धव वाघमारे,सामाजिक कार्यकर्त्या छाया नायकवडे,सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड आदीसह अनेक कार्यकर्ते यावेळी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश घेतला. वंचित बहुजन आघाडी उमरगा तालुका पक्ष संघटन आढावा बैठकीसाठी ॲड.प्रणित डिकले जिल्हाअध्यक्ष धाराशिव,धनंजय सोनटक्के जिल्हा महासचिव,बी.डी.शिंदे माजी जिल्हाध्यक्ष,अनुराधा लोखंडे जिल्हाध्यक्षा वंचित बहुजन महिला आघाडी , मंगलताई आव्हाड महिला आघाडी जिल्हा संघटक,आर.एस.गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष,अरुण गरुड जिल्हा उपाध्यक्ष,विकास बनसोडे जिल्हा संघटक,नामदेव वाघमारे अखिल भारतीय जीवा संघटना जिल्हाध्यक्ष,भारतीय बौध्द महासभाचे संतोष सुरवसे,आनंद कांबळे,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी उपस्थित सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करत असताना ॲड.प्रणित डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव यांनी म्हटले की वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटन वाढ करत असताना गाव तिथे शाखा झाली पाहिजे व प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा अधिकृत सभासद झाला पाहिजे पक्षाच्या वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये सर्व जाती धर्माचे बहुजन समाजातील उपेक्षित शोषित पीडित वंचित कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल.
या बैठकीत जिल्हा परिषद गट,पंचायत समिती गण,नगर परिषद वार्ड,शहर कार्यकारिणी,तालुका कार्यकारिणी,ग्राम शाखा,महिला आघाडी,युवक आघाडी,सभासद नोंदणी,पाक्षिक प्रबुद्ध भारत सभासद नोंदणी व इतर विषयवार सकारात्मक चर्चा झाली.यावेळी तिपा बनसोडे,नेताजी गायकवाड,जय प्रकाश बनसोडे,भारती बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आनंद कांबळे,तालुका सरचिटणीस संतोष सुरवसे,नितीन कांबळे,नवनाथ गायकवाड,राजेंद्र बिराजदार,प्रशांत सांगवी,अकील मुल्ला यासाह मोठ्या संख्येने सर्व जातीधर्मातील महिला पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजक उमरगा लोहरा विधान सभेचे उमेदवार रामभाऊ गायकवाड यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश बनसोडे यांनी केले.आभार नेताजी गायकवाड यांनी मांडले.